६१ व्या वाढदिवसानिमित्त ध्वजदिन निधीसाठी दिली ६१ हजार रुपयांची देणगी
देशसेवेचे कर्तव्य बजावणारी चिपळूण येथील पहिली आदर्श महिला
रत्नागिरी दि.२० : रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथील रहिवासी सुभगा चंद्रशेखर चितळे (निवृत्त एल आय सी ऑफीसर) यांनी आपल्या वयाच्या एकसष्ट वर्षाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी करीता रुपये एकसष्ट हजार देणगी दिली.
देशासाठी आपल्या प्राणाची आहूती देणा-या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून सैनिक सिमेवर रात्रंदिवस देशाचे रक्षण करतो म्हणून आपण या ठिकाणी निश्चिंत राहतो, सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांकरीता काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी सदर राशीचा धनादेश जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांचे नावे श्री उमेश सखाराम आईर, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांना सुपूर्त केला.
यावेळी सेवानिवृत्त सैन्य अधिकारी एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, कल्याण संघटक, रत्नागिरी, लक्ष्मण गवळी, वसतिगृह अधिक्षक चंद्रशेखर भोसले, वसतिगृह अधिक्षिका, चिपळूण सविता गायकवाड, , फेस रिडर अक्षय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सुभगा चंद्रशेखर चितळे तसेच चंद्रशेखर हनुमंत चितळे यांच्या मोलाच्या योगदानासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कौतुक करून आभार व्यक्त केले.