ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांना उद्या सुट्टी

- हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १९ ऑगस्ट २०२५ रोजी शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस होत असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनांनुसार खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
🔹 काय बंद राहणार?
- जिल्ह्यातील सर्व शाळा
- महाविद्यालये
- अंगणवाड्या
नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.