क्राईम कॉर्नरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

आरवली येथे मिनी बसने उभ्या कारला चिरडले; दोन चिमुकल्यांसह चार जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; आमदार शेखर निकम मदतीला धावले

आरवली: मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने एका कारला धडक दिली, ज्यात दोन महिला आणि दोन लहान मुले असे एकूण चौघे जखमी झाले.  ही घटना रविवारी संध्याकाळी ४ वाजता घडली. या अपघातानंतर मिनी बसचा मद्यधुंद चालक आणि त्याचा सहकारी घटनास्थळावरून पळून गेले.

अपघाताच्या वेळी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम हे याच मार्गाने जात होते. त्यांनी तातडीने थांबून जखमींना मदत केली आणि त्यांना रुग्णवाहिकेद्वारे डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघाताचा तपशील

गुहागर येथील (एम.एच. ०४ एलवाय ६६७६) क्रमांकाची आयशर मिनी बस प्रवाशांना रत्नागिरी येथे सोडून परत येत होती. आरवली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस दुभाजकाला धडकून पंक्चर काढण्याच्या दुकानात घुस. त्यावेळी तिथे पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या मारुती वॅगनआर कारला (एमएच ०२ बीजे १५१२) बसने जोरदार धडक दिली.ली. या घटनेत भर धाव बसने कारला अक्षरशः चिरडले.

या अपघातात कारमधील अबोली कल्पेश घडशी (३२), रुद्रा रुपेश घडशी (२९), ऋग्वेद कल्पेश घडशी (५), आणि कियारा रुपेश घडशी (३) हे जखमी झाले. हे सर्वजण मुंबईहून गणपतीसाठी आपल्या मूळ गावी संगमेश्वर तालुक्यातील आंबव-पोंक्षे येथे आले होते. कार पंक्चर झाल्यामुळे ते थांबले होते, त्याचवेळी हा अपघात घडला.

अपघातानंतर चालक रवी अरुण झाल्टे आणि त्याचा सहकारी जंगलात पळून गेले, पण पोलिसांना बसमध्ये चालकाचा परवाना सापडला आहे. अपघाताची माहिती मिळताच माखजनचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक साळवी आणि त्यांचे सहकारी सोमनाथ खाडे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button