एनएमएमएस परीक्षेत फाटक हायस्कूल जिल्हा सर्वसाधारण यादीत अव्वल!

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष सन-२०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत फाटक प्रशालेने जिल्ह्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. या यादीत एकूण ८ विद्यार्थी चमकले आहेत.
गुणवत्ता यादीत आलेल्यांमध्ये आर्य दांडेकर (GEN१५), श्रेया मोरे (GEN२३), रुद्र घडशी (GEN३९), हर्ष ढवळे (GEN४२), चैत्राली खानविलकर (GEN४६), तीर्था सागवेकर (GEN५१), हर्ष मयेकर (GEN५५), रुद्र कांबळी (GEN६०), वेदराज वळांबे (सारथी शिष्यवृत्ती पात्र) यांचा समावेश आहे. या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी 48 हजार रुपये मिळणार आहेत.

संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, सचिव दिलीप भातडे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षायणी बोपर्डीकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, शाळेच्या पर्यवेक्षिका नेहा शेट्ये, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक इंद्रसिंग वळवी, निवेदिता कोपरकर, श्रावणी जोशी, अक्षया भाटकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल पालकांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.