ओशिवळेतील विकास कामातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करा : मनसेचे राजापूरच्या बीडीओंना निवेदन
राजापूर : तालुक्यातील ओशिवळे येथे जिल्हा परिषदेच्या निधी मधून करण्यात आलेला साकव तसेच रस्ता कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष श्री. शंकर पटकारे यांनी केली आहे. या कामातील गैरव्यवहारासंदर्भात त्यांनी राजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना 2 नोव्हेंबर रोजी निवेदन देखील सादर केले आहे.
या संदर्भात मनसेचे विभाग अध्यक्ष श्री. पटकारे यांच्या आरोपांनुसार राजापूर तालुक्यातील ओशिवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जिल्हा परिषद निधीमधून दोन वेगवेगळी विकास कामे करण्यात आली आहेत. त्यातील नारकरवाडी येथील साकवाचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाले आहे. हा साकव हा अवघ्या ६ महिन्यात ढासळून त्याची अवस्था अतिशय बिकट जाली आहे. साकवाचे काम करताना हे लाकडी फळ्या, सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या टाकून काँक्रिट करण्यात आले आहे.
तसेच गावातील बौध्दवाडी रस्त्याची देखील परस्थिती अतिशय बिकट आहे.
गावातील बौद्धवाडी येथील रस्त्यावर डांबर तर पूर्ण टाकलेले नसल्यामुळे रस्त्याची खडी उकरून वर आलली आहे.
या दोन्ही कामाची सखोल चौकशी करुन संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाही करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेकडून करण्यात आली आहे
या संदर्भातील निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. हे निवेदन देताना विभाग संघटक श्री. प्रशांत ( दादा) चव्हाण, उपतालुका अध्यक्ष श्री. प्रदीप कणेरे, विभाग अध्यक्ष श्री. शंकर पटकारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ओशिवळे बौद्धवाडीमधील रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये ५ मीटरची मोरी असून प्रत्यक्षात रस्त्यामध्ये कुठेही मोरी टाकलेली दिसत नाही. मात्र, या मोरीच्या बांधकामाचे बील अधिकाऱ्यांच्या संगमताने काढण्यात आलेले आहे,
– श्री. शंकर पटकारे, विभाग अध्यक्ष मनसे, राजापूर ओझर पंचायत समिती गण.