महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
तुळसुली प्रशालेतील १०० होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण कार्यक्रम

कुडाळ : लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुळसुली येथे श्री. किशोर पाटकर (जिल्हाप्रमुख, शिवसेना – नवी मुंबई) यांच्या सौजन्याने तुळसुली प्रशालेतील १०० होतकरू विद्यार्थ्यांना कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले.

ही सायकल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देईल आणि त्यांच्या प्रगतीस हातभार लावेल, हा विश्वास आहे.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस श्री. दादा साईल, श्री.विनायक राणे, विद्यार्थी वर्ग व तुळसुली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.