कोकण रेल्वे मार्गावर ७ व ८ डिसेंबरला ‘मेगाब्लॉक’
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/08/images-2024-07-11T112750.463-1-496x470.jpeg)
कोकणातून धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी आणि वेरणा दरम्यान झुआरी पुलावरील रेल्वे रुळाच्या कामाकरिता दि. ७ व ८ डिसेंबर रोजी ट्रॅफिक व पावर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:१० मिनिटांपासून ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे गाडी क्रमांक 12218 ही चंदीगड ते तिरुअनंतपुरमदरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी करमाळी स्टेशनच्या आधी 45 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.
याचबरोबर दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून पावणेअकरा वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे नागपूर ते मडगाव दरम्यान धावणारी विशेष गाडी (01139) गोव्यातील करमाळी स्टेशनच्या आधी एक तास दहा मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.