कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त कोच

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हापा- मडगाव तसेच पोरबंदर- कोचुवेली यात दोन एक्सप्रेस गाड्यांना रेल्वेने अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसारहापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या (22908) गाडीला दि. 23 ऑगस्ट रोजी तर मडगाव ते हापा दरम्यान धावणाऱ्या फेरीसाठी (22907) दि. 25 ऑगस्ट स्लीपर चा एक अतिरिक्त कोच जोडला जाणार आहे.

याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला (20910) दिनांक 24 ऑगस्टच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर या फेरीसाठी (20909) स्लीपर श्रेणीतील एक अतिरिक्त कोच दि. 27 ऑगस्टच्या फेरीसाठी जोडण्यात येणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment