ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

खूषखबर !!!!  पुढील तीन दिवस खेड स्थानकातून मुंबईसाठी अनारक्षित रेल्वे गाड्या

रत्नागिरी : गणपती विसर्जनानंतर मोठ्या संख्येने मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने खेडमधून सहा विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. दि. 13,14,15 सप्टेंबरला सलग तीन दिवस या विशेष गाड्या खेड स्थानकातून रवाना होतील.

या गाड्या पनवेलपर्यंत धावतील. सकाळीं सहा आणि दुपारी सव्वा तीन वाजता खेड स्थानकातून या अनारक्षित गाड्या रवाना होतील. या गाड्यांना वीस डबे असतील. या गाड्यांना खेड ते रोह्यार्यंत सर्व स्थानकाला थांबे असतील. पुढे या गाड्या रोहा आणि पनवेल ला थांबतील. दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजता सुटणारी ट्रेन मात्र सीएसटी एम पर्यंत धावेल. या गाडीला पनवेल, दादर आणि ठाणे स्थानकातही थांबा असेल. या गाड्यांच्या घोषणेमुळे कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात होणारी गर्दी कमी करण्यात यश येणार आहे.

सविस्तर वाचा या लिंकवर  | Good news!! Ganpati special trains from Khed railway station

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button