महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

खेडच्या ‘रोटरी’चा ‘कॅश्युशेलोरा’ राज्यात पाचवा!

  • नागपूर येथे राज्यस्तरीय प्रदर्शन; स्पंदन धामणेचे सलग दुसऱ्या वर्षी यश

देवरूख : नागपूर येथे झालेल्या ५३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात खेड येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ’कॅश्युशेलोरा’ या प्रतिकृतीला पाचवा क्रमांक प्राप्त झाला. स्पंदन धामणे याने हे मॉडेल सादर केले होते. स्पंदन धामणे याच्या विज्ञान मॉडेलला राज्यस्तरावर सलग दुसऱ्यांदा पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे.

नागपूर : पारितोषिक स्वीकारताना स्पंदन धामणे, डॉ. गौरव धामणे आणि सौ. मीना कोळपे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, विभागीय शिक्षण विभाग नागपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नागपूर शिक्षणाधिकारी यांच्यावतीने हे प्रदर्शन झाले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित विज्ञान महाविद्यालय नागपूर येथे हे प्रदर्शन झाले.
‘कॅश्युशेलोरा’ या प्रकल्पाला ६ वी ते ८ वी या गटात पाचवा क्रमांक प्राप्त झाला. खेड तालुका व रत्नागिरी ) जिल्हा स्तरावर स्पंदन धामणे आणि अर्णव परकाळे या दोघांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.

या प्रकल्पासाठी शर्वरी धामणे, प्रसाद सावंत, ओंकार काष्टे, राहुल चव्हाण, रिया पवार, गौरव आंब्रे, शुभम मुद्राळे यांनी मार्गदर्शन केले. रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सर्व विज्ञान शिक्षकांचे सहकार्य लाभले. या प्रकल्पाची निर्मिती करण्यासाठी स्पंदनचे वडील डॉ. गौरव धामणे, मीना कोळपे, वैभव बुर्शे, योगेश गुरव, व पालकर फार्म, विघ्रवली यांचे सहकार्य लाभले. रोटरी प्रतिष्ठान खेडचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शाळा पर्यवेक्षक शैलेश देवळेकर, राहुल गाडबैल, तेजश्री कानडे, पृथा वडके यांनी स्पंदन आणि त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

काजू टरफलांचा सदुपयोग, महिलांना रोजगार

कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन घेतले जाते. काजूगर काढल्यानंतर उरलेली टरफले फेकून दिली जातात. या टरफलांचे तेल काढून त्याचा उपयोग विविध ठिकाणी व शेतीसाठीही करू शकतो. काजूच्या टरफलांचे महत्त्व ‘कॅश्युशेलोरा’ या मॉडेलद्वारे मांडण्यात आले होते. हे यंत्र महिला बचत गटाला दिल्यास महिला त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. घरगुती कामे सांभाळून त्या या यंत्राद्वारे स्वयंसिद्धा बनू शकतात. सौर ऊर्जेवर हे उपकरण कार्य करते, असे स्पष्टीकरण स्पंदन धामणे याने विज्ञान प्रदर्शनावेळी दिले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button