महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
डी. बी. जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घडवली अपरिचित कोकणची सफर!
चिपळूण : येथील डीबीजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर अंतर्गत काल (रविवार १ डिसेंबर) सायंकाळी ग्रामिण पुनर्रचना निवासी शिबिरातील पर्यटन विषयक अभ्यासक धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अपरिचित कोकणची सफर घडवली.
यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम लाभला. सत्रानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्नही विचारले. त्यातून विद्यार्थ्यांना असलेली समृद्ध निसर्गाबद्दलची ओढ लक्षात आली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव बापट सर आणि प्राध्यापक बंधू-भगिनी, शिबिरात सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.