बारावी नंतर थेट व्दितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश सुरु
रत्नागिरी : बारावी नंतरच्या तंत्रनिकेतन (Polytechnic) थेट व्दितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रियेकरिता शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी (FC 3009) हे सुविधा केंद्र सुरू आहे. बारावी उत्तीर्ण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी विहीत मुदतीत प्रवेश अर्ज निश्चिती करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. रा. रे. वाकोडकर यांनी केले आहे.
या ठिकाणी स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी, संगणक (Compuuter) अभियांत्रिकी, विदयुत (Electrical) अभियांत्रिकी, अणुविद्युत (Electronics & Tele Communication) अभियांत्रिकी, यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी. या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत.
अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन अर्ज भरणे – दि.१२.०६.२०२४ ते ०३.०७.२०२४, कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती – दि.१२.०६.२०२४ ते ०३.०७.२०२४, तात्पुरती गुणवत्ता यादी- दि.०५.०७.२०२४, गुणवत्ता यादीवरील आक्षेप / अर्ज दुरूस्ती- दि.०६.०७.२०२४ ते ०९.०७.२०२४, अंतिम गुणवत्ता यादी- दि.११.०७.२०२४.
डिप्लोमा प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर Option Form भरणे, विविध प्रवेश फेऱ्या (Cap round ) निवड झालेल्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चिती इ. https://dsd24.dtemaharashtra.gov.in/ या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.विदयार्थ्यांनी https://dsd24.dtemaharashtra.gov.in/ या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी अर्ज ४००/- रू. तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३००/- रू आहे.
ऑनलाईन पध्दतीमध्ये E-Scrutiny व Physical Scrutiny (प्रत्यक्ष हजर राहून पडताळणी ) असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामधील E-Scrutiny पर्यायाने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा केंद्रावर (FC) न जाता स्वतः कागदपत्रे Upload करण्याची सुविधा असून त्यांची कागदपत्रे व अर्ज सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पडताळून निश्चित करण्यात येतील. तसेच Physical Scrutiny पर्यायाने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रावर (FC) प्रत्यक्ष हजर राहून स्वतः च्या अर्जांची नोंदणी व कागदपत्रे Upload करून घ्यावी लागतील.
प्रवेशासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
अधिवास दाखला / जन्म दाखला / राष्ट्रीयत्व दाखला / शाळा सोडल्याच्या दाखल्यावर राष्ट्रीयत्वाची नोंद / Indian Passport, . जातीचा दाखला (आवश्यक असल्यास), नॉन क्रिमेलीअर सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास), उत्पन्न दाखला (आवश्यक असल्यास), EWS सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास), विदयार्थ्यांचा Passport Size Photo, E-mail ID (रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक), मोबाईल नंबर (रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक ).
अधिक माहितीसाठी पं. दे. पोलादे – ९१५८४५९४१२, अ. शे. दाढे – ७७०९८२३३९८, भू. शि. कुलकर्णी – ७५०७६५७६५३, सौ. दि. खर्जुले – ८२७५९४०८४२, या प्राध्यापकांची मार्गदर्शन व समुपदेशन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिये संदर्भातील माहितीसाठी या प्राध्यापकांच्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.