Konkan Railway | मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन आरवलीजवळ बिघडले

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या दैनंदिन जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरवली रोडनजीक नादुरुस्त झाले. यामुळे मडगावकडे जाणारी ही सुपरफास्ट गाडी पर्यायी चिपळूण येथून इंजिन उपलब्ध होईपर्यंत आरवली येथे जवळपास दोन तास थांबवून ठेवण्यात आली होती. याचवेळी मार्गावर धावत असलेल्या काही गाड्या त्या त्या ठिकाणच्या स्थानकांवर सिग्नल मिळेपर्यंत थांबवून ठेवाव्या लागल्या होत्या.

मुंबईहून गोव्यात मडगावला जाण्यासाठी निघालेली गाडी क्र. १२०५१ ही सुपरफास्ट गाडी आरवलीनजीक आली असता गाडीचे इंजिन बिघडले. चिपळूण येथून ही गाडी 10 वाजून दोन मिनिटांनी तिच्या पुढील निर्धारित थांबा असलेल्या रत्नागिरीच्या रत्नागिरीच्या दिशेने रवाना होते. मात्र शुक्रवारी ही गाडी तिच्या निर्धारित वेळेपेक्षा सावर्डे स्थानकापर्यंत 40 मिनिटे विलंबाने धावत होती. पुढे आरवलीनजीक तिचे इंजिन खराब झाल्याने दुपारी १ वाजेपर्यंत ती आरवली येथे उभी होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पर्यायी इंजिन जोडून ही गाडी पुढील प्रवासासाठी मडगावच्या दिशेने मार्गस्थ केली जाणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment