मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर स्वागत!
- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले स्वागत
रत्नागिरी : शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानांतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजापूर येथे सोमवारी दुपारी होत असलेल्या शिवसंकल्प मेळाव्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसंकल्प अभियाना अंतर्गत राजापूर येथे आज दुपारी होत असलेल्या शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने राजापुरात दाखल झाले आहेत.
शिव संकल्प मेळाव्याच्या निमित्त रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 12:50 च्या सुमारास रत्नागिरी विमानतळावर आगमन झाले.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजापूर येथील नियोजित दौऱ्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने राजापूरकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.