महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजशिक्षण
रत्नागिरीतील प्रा. योगेश हळदवणेकर नेट परीक्षा पात्र
रत्नागिरी : शहरातील सन्मित्रनगर येथील प्रा. योगेश हळदवणेकर हे नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. डिसेंबर २०२३ रोजी युजीसी अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा अर्थात नेट परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेचा निकाल १९ जानेवारी रोजी लागला. यामध्ये हळदवणेकर यांनी यश प्राप्त केले. सेट आणि नेट या दोन परीक्षा वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी पात्रता आहे. या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक होता येते.
या आधी हळदवणेकर हे राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. अथक प्रयत्न आणि कठोर परिश्रम केल्याने हे यश मिळाल्याचे हळदवणेकर यांनी सांगितले. या यशात आई, पत्नी यांचा मोलाचा वाटा असल्याचे हळदवणेकर म्हणाले.