महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरीत ईद ए मिलाद उत्साहात

रत्नागिरी : रत्नागिरीत शुक्रवारी ईद ए मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी दावते इस्लामी संस्थेकडून शहरातून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जुलूस (रॅली) काढण्यात आली.
ही रॅली कोकणनगर येथुन निघून मारुती मंदिर सर्कल ते उद्दमनगर येथून फिरुन कोकणनगर येथे तिचा शेवट करण्यात आला. ईदीनिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये लहान मुले, तरूण, वयोवृद्ध नागरिक तसेच चारचाकी वाहने, दुचाकी वाहने सहभागी झाली होती. या वेळी दुवा अलताफ कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर सर्वाना नियाजचे वाटप करण्यात आले.
- हेही वाचा : Konkan Railway | दिवा-रत्नागिरी मेमू ट्रेन २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार!
- Konkan Railway | चिपळूण-दिवा मेमू स्पेशलच्या फेऱ्यात ३ ऑक्टोबरपर्यंत