ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरीत विजांसह अवकाळी पाऊस
रत्नागिरी दि ९ : रत्नागिरी शहर परिसरात मध्यरात्री नंतर एक वाजण्याच्या सुमारास विजांसह अवकाळी पाऊस झाला. आंबा बागांमध्ये नुकतीच फवारणी केलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सोमवारी मध्य रात्रीनंतर पडलेला पाऊस चिंता वाढवणारा ठरला आहे.
अलीकडेच बागांची साफसफाई करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमध्ये फवारणीचे टप्पे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्री नंतर (मंगळवारी) कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे केलेले फवारणीचे काय होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
रत्नागिरी शहरात रात्री एक वाजल्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस जवळपास अर्धा तास सुरू होता.