महाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षण

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृतीला मोहिमेला जिल्ह्यात शुभारंभ


रत्नागिरी दि. १९ : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 पूर्वी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विधानसभेसाठी 2 मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे ( Mobile Demostration Van ) ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हे प्रत्येक मतदान केंद्रस्थळावर पोलीस बंदोबस्तात नेऊन त्याबाबतचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी या कार्यक्रमांतर्गत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.


नागरिकांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक केंद्रास भेट देऊन आपण प्रारुप मतदानाबाबतचे प्रात्यक्षिक पुरावे व आपल्या शंकांचे समाधान करुन घ्यावे. ज्यांना शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या मतदान केद्रस्थळांवरही प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे. त्याची पूर्वप्रसिध्दीही करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या मतदान केंद्रस्थळांवर नियोजित वेळी हजर राहून मतदानाचे प्रात्यक्षिक करावे. आपल्या याबाबतच्या ज्या शंका असतील त्याचे समाधान करुन घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.गायकवाड यांनी केले आहे. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर एक व प्रत्येक उपविभागीय
स्तरावर एक ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र (EVM Demostration Center) स्थापित करण्यात आलेली आहेत. केंद्रात उपस्थितांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट चे प्रात्यक्षिक दाखवून त्यांनाही प्रारुप मतदान करण्याची संधी देण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबतच्या त्यांच्या शंकांबाबतही समाधान करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिके व जनजागृती कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनवर केवळ उमेदवारांची प्रतिकात्मक नावे व चिन्हे (Dummy) दर्शविण्यात आलेली आहेत.


प्रत्येक विधानसभेसाठी 2 मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे ( Mobile Demostration Van ) ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हे प्रत्येक मतदान केंद्रस्थळावर पोलीस बंदोबस्तात नेऊन त्याबाबतचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखविण्यात येणार आहे. व्हॅनवर बसवलेले (LED) स्क्रीनसोबत तालुकास्तरावर पथके तयार केलेली असून त्यांना जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केलेले आहे. याबाबतचा उपविभागीय स्तरावर कोणत्या दिवशी कोणत्या मतदान केंद्रस्थळावर प्रात्यक्षिक होणार आहेत याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यास प्रसिध्दी देण्यात आलेली आहे. प्रात्यक्षिक केंद्राचे ठिकाण, दिवस व वेळ याबाबतचे वेळापत्रक नागरिकांना संबंधित तहसीलदार/उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी मिळेल.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button