ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

लांजातील बोरथडेचा सुपुत्र प्रतिक राणे ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण

पोलीस उपनिरीक्षकपदी झाली निवड

लांजा : प्रयत्नपूर्वक मेहनत केल्यास यशाला गवसणी घालता येते, याचा प्रत्यय लांजा तालुक्यातील बोरथडे गावच्या प्रतीक राणे याने स्पर्धा परीक्षा (एमपीएससी) यशस्वी करून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारून आणून दिला आहे. ग्रामीण भागातही कोणत्याही सोयी सुविधा नसताना स्पर्धा परीक्षा क्रॅक करणे हे आव्हान प्रतिक राणे याने सहज पार केले आहे.

प्रतिक हा लांजा येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे २०१६-१७ या बॅचमधील केमिस्ट्री विभागात बी एस्सी.चा विद्यार्थी होता. पदवी झाल्यानंतर त्याने विविध स्पर्धा परीक्षा यांची तयारी सुरू केली होती. त्याचे प्राथमिक शिक्षण बोरथडे गावातच जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण वाटूळ येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण लांजातील त श्रीराम वंजारे महाविद्यालयामध्ये झाले. प्रतीकचे आई वडील गावातच राहून शेती व्यवसाय करतात.

प्रतीक याला राजापुरातील संकेत गुरसाळे या मित्राचे मार्गदर्शन लाभले. संकेत गुरसाळे हा मंत्रालयामध्ये चांगल्या पोस्टवर आहे. पुणे शहरामध्ये स्व अध्ययन करून प्रतिक याने स्पर्धा परीक्षा देत यशाला गवसणी घातली आहे. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न अखेर पूर्ण केले आहे. आजच पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा रिझल्ट लागला असून प्रत्येक त्याचा आनंद गगनात मावनेसा झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षक 2022 या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. प्रतीक याचे न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा आणि महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button