विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वेची मोठी कारवाई!

- नोव्हेंबरमध्ये २.३३ कोटींचा दंड वसूल
रत्नागिरी : सुरक्षित आणि जबाबदार प्रवासावर भर देत, कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनाने विनातिकीट प्रवास (Without Ticket Travel) करणाऱ्यांविरुद्ध आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. नोव्हेंबर २०२५ या एकाच महिन्यात ४२,९६५ अनधिकृत/अनियमित प्रवाशांकडून रेल्वेने २.३३ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे.
प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवास (Konkan Railway Travel) मिळावा, तसेच तिकीटविरहित प्रवासाला आळा घालता यावा यासाठी कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी (Ticket Checking Drive) मोहिमांची वारंवारता वाढवली आहे.
आकडेवारी काय सांगते?

कोकण रेल्वे प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये राबवलेल्या १,०७० विशेष तपासणी मोहिमांनी ही मोठी वसुली झाली आहे.
सणासुदीत कारवाई आणखी तीव्र
आगामी हिवाळा, ख्रिसमस (Christmas) आणि नववर्षाच्या (New Year) सणांदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) येत्या काळात संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम आणखी तीव्र करणार आहे.
Letest News : लाडघर समुद्रकिनारी सायकल, धावणे, बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न
प्रवाशांना आवाहन
कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट (Valid Ticket) खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि अशा प्रवाशांवर कठोर कारवाई केली जाईल.




