महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

शासकीय योजनांच्या जनजागृत्ती व्हॅनला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा !

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची जनजागृत्ती

रत्नागिरी, दि. 10  : शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात आजपासून जनजागृत्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या व्हॅनला हिरवा दाखविला.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजीत गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.

शासकीय योजना

शासकीय योजना
शासकीय योजना

अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध असणाऱ्या योजना यांची माहिती या एलईडी व्हॅनद्वारे देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाध, कन्यादान
योजना, स्टँडअप योजना, कृषी स्वावंलबन योजना, दलित वस्ती सुधारणा कार्यक्रम, रमाई आवास योजना, राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता योजना, स्वाधार योजना यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर कृषी, आरोग्य, वन विभाग, महसूल विभाग, कौशल्य विकास आदींचा समावेश आहे. रत्नागिरी पोलीस दलामार्फत विशेष जनजागृत्ती

Letest News : लाडघर समुद्रकिनारी सायकल, धावणे, बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न

अमली पदार्थापासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मिशन फिनिक्स
अंतर्गत मोहीम सुरु केली आहे. सायबर गुन्हे घडू नयेत, फसवणुकीपासून नागरिकांनी दूर रहावे, याबाबत
जनजागृत्तीपर देण्यात येणारे संदेश, सायबर फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते त्यापासून काय काळजी घ्यावी,
याबाबतही या जनजागृत्ती मोहिमेत समावेश आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button