सिव्हील हॉस्पिटलमधील नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग झाला अद्ययावत

- रोटरी क्लब रत्नागिरीचे सौजन्य
- सुमारे 32 लाखांच्या उपकरणांचे लोकार्पण
रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता वजात बालके अतिदक्षता विभागात सुमारे ३२ लाख किमतीची अद्ययावत उपकरणे रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा जिल्हा शासकीय रुग्णालयात पार पडला.

लोकार्पण सोहळा रोटरी प्रांत ३१७० चे प्रांतपाल नासिर बोरसादवाला यांच्या शुभ हस्ते झाला. कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले , रोटरी प्रांत ३१३२ प्रांतपाल स्वाती हेरकल , रोटरी प्रांत ३१७० माजी प्रांतपाल संग्राम पाटील , रोटरी क्लब ऑफ सांगलीचे प्रमुख दाते किशोर लुल्ला, रोटरी क्लब ऑफ मिडटाउनचे मल्लिकार्जुन बड्डे, धर्मेंद्र खिलारे आणि विलास सुतार , सिव्हिल हॉस्पिटल अससिस्टन्ट सिव्हिल सर्जन डॉ विकास कुमरे आणि सिव्हिल स्टाफ , रोटरी अध्यक्ष श्रीकांत भुर्के , माजी अध्यक्ष राजेंद्र घाग, सचिन प्रमोद कुलकर्णी ,रुपेश पेडणेकर , निलेश मुळे , सचिन सारोळकर, देवदत्त मुकादम ,विनायक हातखंबकर, धरमसी चौहान, अशोक घाटे, मुकेश गुप्ता , कीर्तिकुमार पटेल , मंदार आचरेकर, अंजली इंदुलकर, देवयानी वाघधरे , प्रकल्प आराध्ये, आनंद चौगुले, दिलीप भाटकर , दीप्ती भाटकर, डॉ अविनाश भागवत, डॉ मनीषा भागवत , राहुल पंडित , मिलिंद पावसकर , डॉ हेमल काळे ,केतन सावंत , माधुरी कळंबटे , वेदा मुकादम , सचिन शिंदे, नीता शिंदे , मंदार सावंतदेसाई , मिलिंद भुर्के , मकरंद भुर्के , रोहित वीरकर , नमिता कीर , नरपतसिंग कुम्पवात , प्रसाद मोदी , संतोष जैन, शफिक सय्यद , सुरेंद्र यारम , विजय पवार , विश्वजित कोतवाडेकर उपस्थित होते . या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने हि सर्व उपकरणे बहाल केली असली तरी त्यामध्ये अमेरिकेतील रोटरी क्लब नोवी , प्रांत ६३८० अमेरिका , रोटरी प्रांत ३१७० , रोटरी फौंडेशन यांचा देखील मोलाचा वाटा आहे. प्रांतपाल नासिर आणि स्वाती यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ फुले यांच्याबरोबर सर्व उपकारांची पाहणी केली. अतिदक्षता विभाग असल्याने त्या विभागात सर्वाना प्रवेश वर्ज होता.

त्यानंतर दुपारी ३.३० वाजता सिल्व्हर स्वान हॉटेल येथील हॉल मध्ये दात्यांचा कृतज्ञता सोहळा थाटात पार पडला, यामध्ये या प्रोजेक्टला मदत करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तरी कार्यक्रमाला रत्नागिरीतील विविध समाज कार्यांत सक्रिय क्लब आणि ग्रुप उपस्थित होते . दीपक गद्रे – अध्यक्ष गद्रे उद्योग समूह , बिपीनचंद्र गांधी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन , स्वप्नाली करे सचिन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन ,मनोज मुनीश्वर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन , नित्यानंद भुते अध्यक्ष क्रेडाई , संतोष कुष्टे सदस्य भारत शिक्षण मंडळ , नेताजी कुंभार प्राचार्य D.Ed कॉलेज , डॉ केतन कुमार चौधरी अससिस्टन्ट गव्हर्नर रोटरी प्रांत ३१७०, लायन्स क्लब सचिव संजय पटवर्धन, प्रांतपाल नासिर बोरसादवाला यांनी रत्नागिरी रोटरी क्लब तसेच रत्नागिरीवासियांचे अभिनंदन केले आणि हि फक्त सुरवात आहे अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स क्लबने दरवर्षी राबवावे, असे आवाहन केले.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ संघमित्रा फुले यांनी रोटरीचे आभार मानले तसेच या उपकरणांमुळे रत्नागिरी सिव्हिल मधील नवजात बालकांचा मृत्युदर हा शून्य करण्यात मोठी मदत होईल असे प्रतिपादन केले.
रोटरीच्या माजी आणि आजी अध्यक्षांनी ह्या प्रोजेक्ट मध्ये योगदान दिलेल्या रोटरी सदस्यांचे कौतुक केले आणि क्लब रत्नागिरीच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहील अशी ग्वाही सर्वाना दिली.
किशोर लुल्ला यांनी नवजात अतिदक्षता विभागाचे वैयक्तिक अनुभव समोर सांगितलं आणि या विभागाचे महत्व सांगितलं
सचिन सारोळकर यांनी ह्या प्रोजेक्टचा पूर्ण प्रवास लोकांसमोर मांडला . मल्लिकार्जुन बड्डे यांनी या प्रोजेक्टसाठी पैसा कसा उभारला गेला याची माहिती दिली.
सचिव प्रमोद कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन वेदा मुकादम , माधुरी कळंबटे आणि नीता शिंदे यांनी केले.
हा प्रोजेक्ट तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व रोटरी सदस्यांनी अपार कष्ट केले