हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चहापान कार्यक्रम

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ना. नितेश राणे व अन्य मंत्री आमदार अधिकाऱ्यांची उपस्थिती
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेला चहापान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्यावर आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आयोजित या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, विविध विभागांचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आगामी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि राज्यातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी सकारात्मक चर्चांची देवाणघेवाण झाली. उपस्थित सर्व मान्यवरांनी राज्याच्या प्रगतीसाठी एकसंघपणे आणि निर्धाराने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला.
या चहापान कार्यक्रमामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांमध्ये एकतेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देण्यात आला, ज्यामुळे आगामी अधिवेशन अर्थपूर्ण आणि फलदायी ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.




