Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर मंगळवार आणि गुरुवारी मेगाब्लॉक
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करंजाडी ते कामथे दरम्यान दि. 21 नोव्हेंबर रोजी अडीच तासांचा तर कर्नाटक राज्याच्या हद्दीत कुमटा ते भटकळ स्थानकादरम्यान दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी करंजाडी ते चिपळूण मधील कामथे स्थानकादरम्यान दुपारी बारा 40 ते सायंकाळी तीन वाजून दहा मिनिटांपर्यंत म्हणजे सुमारे अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. करंजाडी ते कामठे दरम्यानच्या मेगाब्लॉकमुळे कोईमतुर ते जबलपूर ही दिनांक 20 नोव्हेंबरला प्रवास सुरू होणारी गाडी कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर मेगा ब्लॉकमुळे मडगाव ते संगमेश्वर दरम्यान 110 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे. मेगाब्लॉकमुळे सावंतवाडी ते दिवा (10106) ही गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर दरम्यान एक तास दहा मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
याचबरोबर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी च्या कुमठा ते भटकळ दरम्यानचा तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे तीन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.