उद्योग जगतमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

Konkan Railway |  रत्नागिरी ते उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर मालवाहतूक सेवा

  • कोकण रेल्वेने उपलब्ध केली  उद्योजकांसाठी आयात निर्यात सुविधा
  • रत्नागिरीच्या गद्रे कंपनीचे मत्स्य उत्पादन पहिल्या मालगाडीने निर्यातीसाठी रवाना

रत्नागिरी : निर्यात आणि आयात क्षेत्रात कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात येथील उत्पादने पाठवता येऊ लागली आहे. याचा शुभारंभ गद्रे मरीन एक्सपोर्ट पहिल्या वीस मिनी कंटेनर रेक पाठवून काही दिवसांपूर्वीच करण्यात आला आहे. या करिता कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक उत्पादने जगाच्या पाठीवर विविध देशात पाठवली जातात तशीच विविध उत्पादने येथे आयात ही होतात.यापूर्वी गोव्यातून रवाना होणाऱ्या रेकमधून जिल्ह्यातील उत्पादने निर्यातीसाठी पाठवली जात होती. पण आता कोकण रेल्वेने या विषयात मोठे पाऊल उचलत रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूकची यंत्रणा उभी केली आहे. यामुळे आता निर्यात होणारा माल रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात रवाना होणार आहे. याचा शुभारंभ रत्नागिरीच्या गद्रे मरीन एक्सपोर्टच्या निर्यात मालाने करण्यात आला आहे. गद्रे मरीन एक्सपोर्टचे पहिले वीस पूर्णतः वातानुकूलित मिनी कंटेनर रेक रत्नागिरीतून रवाना करण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट,गद्रे मरीन एक्सपोर्ट चे संचालक अर्जुन गद्रे,कोकण रेल्वेचे विभागीय वाहतूक प्रबंधक आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थितीत होते. रत्नागिरी स्थानकातून हे पहिले मिनी कंटेनर रेक रवाना करण्यात आले.

रत्नागिरी रेल्वे स्थानकातून आयात निर्यात सुविधा

आयात व निर्यातदारांसाठी परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वे प्रयत्न करीत आहे. कोकणातील आयात निर्यातदारांनी कोकण रेल्वेच्या या प्रयत्नांना साथ द्यावी.
-संतोष कुमार झा, व्यवस्थापकीय संचालक कोकण रेल्वे.

या करिता रत्नागिरी रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेकडून स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोकणातील आयात व निर्यातदारांना यामुळे गोव्यातून उपलब्ध होणाऱ्या रेकवर अवलंबून रहावे लागणार नाही आहे. कोकणातील मत्स्य आणि फळ प्रक्रिया उद्योगांकरिता हि मोठी सुविधा कोकण रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button