Konkan Railway | उधना- मंगळूरु विशेष एक्सप्रेस ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार!
खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वरसह रत्नागिरी, राजापूरला थांबणार!
- कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार सुधारित वेळेनुसार धावणार उधना एक्सप्रेस
रत्नागिरी : मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली आणि कोकण रेल्वे मार्गे धावत असलेली उधना (सुरत ) ते मंगळूरु जंक्शन या विशेष गाडीच्या फेऱ्या 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहेत. आठवड्यातून दोन दिवस ही गाडी चालवली जाते.
मागील काही महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर उधना ते मंगळूरु जंक्शन (09057 / 09058 ) ही गाडी विशेष गाडी म्हणून चालवली जात आहे. या गाडीला लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन मागील काही महिन्यांपासून या गाडीच्या फेऱ्यांनी मुदतवाढ दिली जात आहे. आता पुन्हा 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत या गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे ही गाडी सुधारित वेळेनुसार चालवली जाणार आहे.
याबाबत कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार उधना ते मंगळूरू मार्गावर धावताना दिनांक 3 ते 30 ऑक्टोबर 2024 या कालावधीत आठवड्यातील दर बुधवार आणि रविवारी ही गाडी धावेल तर परतीच्या प्रवासात मंगळूर जंक्शन ते उधना दरम्यान ही गाडी दिनांक 4 जुलै ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत आठवड्यातील दर गुरुवार आणि सोमवारी धावणार आहे. सुरतजवळील उधना येथून मंगळुरू साठी सुट्टा नाही गडी रात्री आठ वाजता निघणार आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजून 45 मिनिटांनी ही गाडी मंगळूरु जंक्शनला पोहोचेल.
मंगळुरू येथून उधनासाठी निघताना ही गाडी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी ते उदना जंक्शनला पोहोचेल.
उधना- मंगळूरु विशेष एक्सप्रेस या स्थानकांवर थांबेल
वलसाड, वपी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमली, मडगाव जं., काणकोणा, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकल, मूकांबिका रोड बायंदूर, कुंडापूर, उडुपी, मुलकी आणि सुरतकल
अशी असेल डब्यांची रचना
एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.