ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी
Konkan railway | रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष गाड्या

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त – 2025 करिता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जाहीर झालेल्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहेत
- गाडी क्रमांक 01125 / 01126 लोकमान्य टिळक (ट) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (ट) विशेष
गाडी क्रमांक 01125 लोकमान्य टिळक (ट) – मडगाव जं. विशेष गाडी 14/08/2025 (गुरुवार) रोजी रात्री 22:15 वाजता लोकमान्य टिळक (ट) येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:45 वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01126 मडगाव जं. – लोकमान्य टिळक (ट) विशेष गाडी 15/08/2025 (शुक्रवार) रोजी दुपारी 13:40 वाजता मडगाव जं. येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक (ट) येथे पोहोचेल.
या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी येथे थांबा असेल.
संरचना: एकूण 22 LHB डबे = फर्स्ट एसी – 01 डबा, 2 टायर एसी – 03 डबे, 3 टायर एसी – 07 डबे, स्लीपर – 08 डबे, पॅन्ट्री कार – 01, जनरेटर कार – 02. - गाडी क्रमांक 01127 / 01128 लोकमान्य टिळक (ट) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (ट) विशेष
गाडी क्रमांक 01127 लोकमान्य टिळक (ट) – मडगाव जं. विशेष गाडी 16/08/2025 (शनिवार) रोजी रात्री 22:15 वाजता लोकमान्य टिळक (ट) येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:45 वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01128 मडगाव जं. – लोकमान्य टिळक (ट) विशेष गाडी 17/08/2025 (रविवार) रोजी दुपारी 13:40 वाजता मडगाव जं. येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक (ट) येथे पोहोचेल.
या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी येथे थांबा असेल.
संरचना: एकूण 22 LHB डबे = 2 टायर एसी – 01 डबा, 3 टायर एसी – 06 डबे, स्लीपर – 09 डबे, जनरल – 04 डबे, SLR – 01, जनरेटर कार – 01.
गाडी क्रमांक 01126 आणि 01128 साठी आरक्षण 09/08/2025 रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.
वरील गाड्यांच्या थांब्यांच्या आणि वेळेच्या सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.