महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
Konkan Railway | नागपूर -मडगाव विशेष गाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/11/IMG-20240812-WA0000.jpg)
रत्नागिरी : नागपूर ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला १ जानेवारी 2025 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी जाहीर केल्यानुसार या गाडीच्या फेऱ्या दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी संपणार होत्या.
मागील अनेक महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर नागपूर ते मडगाव अशी विशेष रेल्वे गाडी (01139/01140) चालवली जात आहे. या गाडीच्या फेऱ्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, मुदतवाढ देताना या गाडीला कोकण रेल्वे मार्गावर कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
आठवड्यातून दोन दिवस ही गाडी कोकण रेल्वे मार्गे धावते. या गाडीला कोकण रेल्वे मार्गावर आता सावंतवाडीलाही थांबा मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.