राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुनसमधील मैत्रेयी साळवी हिला कास्य पदक

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून गौरव

पाली (रत्नागिरी ) : भोपाळ येथे सुरू असलेल्या ६७ व्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत लांजा तालुक्यातील पुनस येथील मैत्रेयी मनोज साळवी हिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे.

५० मीटर नेमबाजी स्पर्धेत मैत्रेयी हिने मिळवलेल्या यशाबद्दल जिल्हाभरातून तिचे कौतुक होत असतानाच राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी  त्यांच्या पाली निवासस्थानी शाल व श्रीफळ देऊन तिचा सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment