महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
Mumbai-Goa highway | परशुराम घाटातील दरडप्रवण क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

चिपळूण : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण आणि खेड दरम्यानच्या परशुराम घाटातील दरड प्रवण क्षेत्राची आज जिल्हाधिकारी श्री. एम देवेंदर सिंह , जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांचे समावेत पहाणी केली.
या पाहणी दरम्यान संबंधित विभागाला जिल्हा प्रशासनातील या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य त्या सूचना देण्यात येऊन पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती काळात खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान कालच जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी कोकण तसेच कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाची देखील पाहणी केली. चार दिवसापूर्वी अणुस्कुरा घाटात दरड कोसळून वाहतूक वाहतूक पडली होती. आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली.