बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्य महत्त्वाचे : भरत चौगुले
देवरुख दि. १६ : मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी बाल वयात योग्य पोषण होण्यासाठी शालेय पोषण आहार योजनेप्रमाणे आपापल्या घरी सुद्धा पालकांनी आहाराची व पाककृतीची काळजी घेऊन आपल्याकडे उपलब्ध न फवारलेली नाचणी सारखी मुलांना न आवडणारी काळया भाकरीचे विविध पाककृतीने वेगळ्या पदार्थात रूपांतर करून बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्य अत्यंत महत्त्वाचे ठरेल यात शंका नाही. अशा प्रकारचे मार्गदर्शन पंचायत समिती संगमेश्वर (देवरूख)चे गटविकास अधिकारी भरत चौगुले यांनी शिक्षण विभाग पंचायत समिती संगमेश्वर ” प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना” आयोजित तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेमध्ये केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,राज्यात सध्या
” मिशन आपुलकीचे” हा नाविन्यपूर्ण उपक्रम चालू असून यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक साहित्य देण्यासाठी, व दर्जा वाढवण्यासाठी, गौरी गणपती येणारे माजी विद्यार्थी, चाकरमनी, प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, व्यावसायिक, दानशूर व्यक्ती, अधिकारी यांच्या लोकसभागातून मिळवण्यासाठी प्रवृत्त करावेत. गावाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारकरणारा , तसेच श्रद्धा भावनांना व्यापक कर्तव्याच्या पुर्तीत रूपांतरित करता यावे, यासाठी सर्वांच्या सहभागाचे प्रतीक ” म्हणजेच मिशन आपुलकी ” हा हेतू स्पष्ट केला.
या स्पर्धेमध्ये ३१ केंद्रातील एक आलेल्या शाळांच्या स्वयंपाकिनीनी सहभाग घेऊन नाचणी, बाजरी, गहू, तांदुळ, ज्वारी तसेच अनेक प्रकारच्या डाळी पासून बनवून आणलेल्या विविध प्रकारच्या पदार्थांचा पाककृती स्पर्धेमध्ये समावेश होता.पंचायत समिती देवरुख चे गटशिक्षण अधिकारी प्रदीप पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना केवळ चटपटीत चटकदार, दर्जाहीन ,तेलकट पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड आपल्या मुलांना देऊन पोषणास कारणीभूत ठरण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पिकातील नाचणी, वरी, भात इत्यादी तृणधान्यांचा वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण पाककृतीमध्ये समावेश करून विविध पदार्थ तयार करून काळी भाकरी न आवडणाऱ्या मुलांना अशा स्वरूपात देण्याचा प्रयत्न करावा, याच हेतूने आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलें. व आपल्या तालुक्यातून स्वयंपाकी भगिनींनी उत्तम प्रतिसाद दिला असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना नक्कीच द्विगुणीत करेल असा आशावाद व्यक्त केला.
पंचायत समिती देवरुखचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद कुमार शिंदे यांनी मार्गदर्शन करताना फवारलेली धान्य , कडधान्यं, फळे ,फळभाज्यां, खाण्यापेक्षा विना औषधातील, तृणधान्य आपल्या घराच्या अवतीभवती पिकवून या प्रकारचे अन्न आपणांसह मुलांना देऊन निरोगी पोषण ही सर्वात मोठी गरज आहे हे समजून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले.
व्यासपीठावर जिल्हा समन्वयक कांबळे,वि.अ.नाईक, त्रिभुवने, खडस, कांबळे तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले , तर आभार प्रदर्शन शशिकांत त्रिभुवने यांनी केले.
या स्पर्धेचे परीक्षण रोहिणी चव्हाण, श्रीमती किरवे, श्रीमती भाटकर ,व मोहन कनवजे यांनी केले.
प्रथम क्रमांक.. …शाळा देवरुख नंबर ३
द्वीतीय क्रमांक…. शाळा तिवरे तर्फे देवळें
तृतीय क्रमांक…. शाळा माय प
अनुक्रमे बक्षिसे ५०००रू/. ३५००रू./ २५००रू.
याप्रमाणे प्राप्त झाली.
या कार्यक्रमातील ठळक क्षणचित्रे
- सण असल्याप्रमाणे स्वयंपाकी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होत.
- काही महिलांनी सादरीकरण गाण्यातून केलेत.
- एका स्वयंपाकी महिलेने तरी ५२ प्रकारचे तृणधान्य पदार्थ बनवून आणले होते.
- सर्वांचे पदार्थांचे स्टॉल फुलांनी सजवलेले होते.