महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजहेल्थ कॉर्नर

कर्करोग निदान अत्याधुनिक फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण

  • पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते रुग्णालय) चा फित कापून कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, राहूल पंडित, बंड्या साळवी, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅनची पाहणी केली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनी व्हॅनबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली.
जिल्ह्यामध्ये मे व जूनमध्ये प्रत्येक तालुक्यात गावभेटीतून व्हॅन मध्ये मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून, कर्करोगाचे निदान केले जाणार आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे वेळेवर निदानात सुधारणा होईल आणि संभाव्यतः अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. ही व्हॅन सामान्य कर्करोगांच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे, ज्यात सुरुवातीला डिजिटल मशीन वापरून स्तनाच्या तपासण्या आणि कॉल्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
तरी या संधीचा मोफत लाभ घेऊन नागरिकांनी मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावा
पालकमंत्री उदय सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर आदी संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button