काटवली ग्रा. पं. कार्यालयाच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Team RatnagiriLive
1 Min Read

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त व निर्मलग्राम म्हणून गौरव झालेल्या काटवली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामविकासाची खरी ओळख म्हणजे पारदर्शक प्रशासन, सशक्त स्थानिक स्वराज्य आणि सर्वसमावेशक विकास ही आहे. काटवली ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार आणि एकात्मतेचा संदेश हा इतर गावांसाठीही प्रेरणादायक असून नव्या इमारतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि विकासाचा वेग अधिकच वाढेल, याचा मला पूर्ण विश्वास मला असल्याचे प्रतिपादन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, राजेंद्र महाडिक, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment