मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांचे जे एस डब्ल्यू ओ पी जे प्रशिक्षण केंद्र जयगड येथे कार्यानुभव प्रशिक्षण

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव, रत्नागिरीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मत्स्यसंवर्धन अभियांत्रिकी या विषयांतर्गत कार्यानुभव प्रशिक्षण जे एस डब्ल्यू ट्रेनिंग सेंटर मधील “शोभिवंत मासे प्रकल्प” विभागामध्ये आयोजित केला गेला. या प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव चे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव , निलेश मिरजकर व सुशिल कांबळे यांनी शोभिवंत मासे प्रकल्प विभागाला भेट देऊन त्या बाबतची माहिती करून घेतली.
प्रशिक्षण केंद्रातील शोभिवंत मत्स्य शेती प्रकल्प जे एस डब्ल्यू चे वरिष्ठ अधिकारी श्री. अनिल दभिच व त्यांचे सहकारी योगिता महाकाल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. त्यांनी या ट्रेनिंग सेंटर मध्ये राबविले जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यानी प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेल्या कौशल्यांचा तसेच केलेल्या कामाचे सादरीकरण केले.
प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी जे एस डब्ल्यू ट्रेनिंग सेंटर येथे प्रदान केलेल्या सुविधांचे कौतिक केले. या भेटीत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे वेगळेपण लक्षात घेऊन आणि त्यातून उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधीवर चर्चा करण्यात आली. जे एस डब्ल्यू ओ पी जे प्रशिक्षण केंद्रातर्फे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रमाणपत्र व भेटवस्तू प्रदान करणेत आली.
JSW व मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन यांनी मत्स्य क्षेत्रातील कौशल्याच्या आणि रोजगाराच्या संधी लोकांपर्यन्त पोहोचवण्याच्या दृष्टीने परस्पर सहकार्याचे प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.