ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये धीरज वाटेकर यांचे पर्यटनावर व्याख्यान

चिपळूण : जागतिक पर्यटन दिन २०२५ निमित्ताने लायन्स क्लब ऑफ चिपळूण युनिटी यांच्यावतीने शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थांसमोर ‘कोकणातील ‘शाश्वत परिवर्तन’ पर्यटन’ या विषयावर पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी व्याख्यान दिले.
यावेळी लायन्स चिपळूण युनिटी अध्यक्ष एकता मुळ्ये, मयुरी काटकर, शाळेचे उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, श्रीमती रेवती कारदगे, चिपळूणला पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणारे विलास महाडिक आदी उपस्थित होते.
या व्याख्यानाच्या निमित्ताने शाश्वत आणि हरित कोकण पर्यटनाच्या जतन आणि संवर्धनाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.