लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत स्वातंत्र्य दिनापासून ‘ड्रेस कोड’ लागू
लांजा : लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल आणि तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि कर्मचारी यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून या ड्रेस कोडमध्ये कर्मचारी दिसून आले. शाळेच्या इतिहासात प्रथमच हा ‘ड्रेस कोड’ लागू करण्यात आला आहे.
पालक वर्गाने या निर्णयासंदर्भात समाधान व्यक्त केले आहे. लांजा कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालय न्यू एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळ यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये सुरक्षेसाठी शाळा परिसरावारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एक्वागार्ड शाळेमध्ये बसवण्यात आले आहेत. शाळा कॅन्टीनमध्येही अनावश्यक पदार्थ देण्यास मनाई करण्यात आली आहे.
न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंत शेट्ये सचिव महेश सप्रे, महमंद रखांगी, अभिजीत जेधे, प्रसन्न शेट्ये, राजेश शेट्ये,, धानिता चव्हाण, स्वाती पावसकर, निरंजन देशमुख आदी सर्व संचालक मंडळ यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.