अवघा ६ वर्षीय बेंजो वादक चित्राक्ष घरत याचा ‘चाईल्ड केअर’कडून विशेष सन्मान!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगड तर्फे उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध लहान वयातील बेंजो वादक म्हणून कु. चित्राक्ष स्वप्निल घरत ( 6वर्ष ) भेंडखळ, उरण याचा उरण विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उरण तालुक्यातील पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्याहस्ते पुरस्कार देऊन चित्राक्ष घरत यांना सन्मानित करण्यात आला.
उरण तालुक्यातील सर्वात कमी वयाचे बेंजो वादक म्हणून उरण तालुक्यात नव्हे तर रायगड, नवी मुंबई, मुंबई येथे या छोट्या बेंजो वादक मध्ये चित्राक्ष घरत याची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी उरण तालुक्याचे नाव तालुक्या बाहेर गाजवल्याबद्दल चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे उरण विशेष सम्मान पुरस्कार देण्यात आला, अशी माहिती यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांनी दिली.
कु. चित्राक्ष स्वप्निल घरत याला वयाच्या तीन ते चार वर्षापूर्वी घरातच बँड वाजवण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच त्याने व्यावसायिक बँडमध्ये त्याने वादन केले असता त्याचे वादन मोठ्या प्रमाणात सर्वांना आवडले याचाच धागा पकडून मुंबई येथील सुप्रसिद्ध बँजो पथकाने त्याच्या व्हिडिओ आपल्या युट्युब तसेच इंस्टाग्रामला पोस्ट केल्या होत्या त्या पोस्टला लाखाच्या वर लाईक मिळालेल्या आहेत. चित्राक्ष हा उत्कृष्ट ढोलकी तसेच पखवाज वाजवतही वाजवतो. परंतु क्लासिकल शिक्षण मिळावे यासाठी क्लासिकल पखवाज चे शिक्षण तुषार घरत यांच्याकडे शिक्षण घेत आहे. आजपर्यंत चीत्राक्षला विविध कार्यक्रमात त्याचा मानसन्मान झालेला आहे. विविध पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले आहे असे चित्राक्ष यांचे वडील स्वप्नील घरत यांनी अभिमानाने सांगितले.
या प्रसंगी चित्राक्षचे वडील स्वप्नील घरत,चित्राक्षची आई अक्षया घरत, काका सतिष घरत, आजी शारदा घरत, शैलेंद्र घरत, यशवंत म्हात्रे, प्रदीप ठाकूर, नक्ष घरत तसेच संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष विकास कडू, चाईल्ड केअर संस्थेचे मीडिया सल्लागार विठ्ठल ममताबादे,कार्याध्यक्ष मनोज ठाकूर, उपाध्यक्ष तुषार ठाकूर, उपाध्यक्ष कु. ह्रितिक पाटील, खजिनदार राजेश ठाकूर, सहसचिव कु उद्धव कोळी, सहखजिनदार रोशन घरत, सदस्य रोशन धुमाळ उपस्थित होते.