जनता दरबारात राज्यभरातील शेकडो तक्रारींचा तत्काळ निपटारा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे फडणवीस सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येथील बहुतांश तक्रारींचा तत्काळ निपटारा केला.
जनता दरबारात प्राप्त झालेल्या आणि तत्काळ निपटारा होऊ शकलेल्या तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आले.
या संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, लोकांच्या अडचणी सोडविणे हे माझे प्राधान्यक्रम असून आज बाळासाहेब भवन, मुंबई येथे जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील शेकडो नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या याचे समाधान आहे. ज्या नागरिकांना मंत्रालय व शासकीय कार्यालयात येणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.