आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात १३वीचे प्रवेश सुरू
देवरूख (सुरेश सप्रे) : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक विज्ञान, बी. व्होक.- सस्टेनेबल ॲग्रीकल्चर आणि बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस वर्गांकरिता प्रवेश अर्ज दि.२७ मे पासून ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले असून, दि.१२ जून पर्यंत ऑनलाईन प्रवेश उपलब्ध होणार आहेत. दि.२७ मे ते दि. १२ जून,२०२३ पर्यंत विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या mumoa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर प्रवेश पूर्व नाव नोंदणी करून त्याची प्रत प्रवेश अर्जासोबत जोडायची आहे.
प्रथम वर्ष वाणिज्य (बी. कॉम.) वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यापीठ/शासकीय धोरणानुसार संवर्गनिहाय आरक्षण व गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रथम वर्ष, वाणिज्य वर्गात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या mumoa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर प्रवेश पूर्व नाव नोंदणी करून त्याची प्रत प्रवेश अर्जासोबत जोडायची आहे. इन हाऊस स्टुडंट्स तसेच देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज कागदपत्रांसह दि.२७ मे ते १२ जून, २०२३ दुपारी १:०० वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या कार्यालयात जमा करावेत. दि.१३ जून, २०२३ रोजी इन हाऊस स्टुडन्टची प्रथम गुणवत्ता यादी सायं. ५:०० वाजता महाविद्यालयाच्या काचफलकात तसेच महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर (www.aspcdevrukh.ac.in) प्रदर्शित करण्यात येईल. इनहाऊस स्टुडंट्स प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना दि. १४ ते १७ जून, २०२३ रोजी (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी १०:०० ते १:३० पर्यंत प्रवेश घ्यावा. इनहाऊस स्टुडन्ट प्रवेश प्रक्रिया संपल्यावर जागा रिक्त राहिल्यास अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी आरक्षणासह दिनांक १७ जून,२०२३ रोजी सायं. ५:०० वाजता महाविद्यालयाच्या काचफलकात तसेच संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल. या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी दिनांक १९ व २० जून, २०२३ रोजी सकाळी १०:०० ते १:३० या वेळेत आपला प्रवेश निश्चित करावा.
प्रथम वर्ष कला, विज्ञान, संगणक विज्ञान, बी. व्होक.- सस्टेनेबल ॲग्रीकल्चर आणि बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस वर्गात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या mumoa.digitaluniversity.ac प्रवेशपूर्व नोंदणी करून त्याची प्रत प्रवेश अर्जासोबत जोडल्यावर महाविद्यालयात थेट प्रवेश देण्यात येईल.
प्रथम वर्ष पदवीच्या कोणत्याही वर्गात प्रवेश घेण्यासाठी अधिक माहितीसाठी कार्यालयामध्ये 02354-260058 आणि श्री. अमित कुलकर्णी 9890244094 यांच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे.