आदर्श प्रियदर्शनी महिला मंडळ तर्फे कळंबूसरेत हळदीकुंकु समारंभ उत्साहात संपन्न
उरण(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील कलंबूसरे येथील आदर्श भवनात आदर्श प्रियदर्शनी महीला मंडळ तर्फे 22 जानेवारी रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात थिएटर ऑफ रेलेवंस अभ्यासक , लेखिका आणि अंतरराष्ट्रीय रंगकर्मी अश्विनी नांदेडकर व त्यांच्या सहकलाकार कोमल खामकर, सायली पावसकर ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच त्यांनी एक नाटिका सादर करून महिलांना एक संदेश दिला.की घर हे महिलेवर अवलंबून असते आपणच घरात संस्कार करून घर सुधारले पाहिजे असे अनेक मुद्दे नाटिके मधून सादर केले.सर्व महिलांनी या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद देत वेगवेगळे कार्यक्रम सादर केले .यावेळी महिलांनी एकमेकींना वाण देण्यात आले.
या प्रसंगी रायगड जिल्हा महीला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संध्याताई ठाकूर , उरण तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा रेखा मनोज घरत, तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा निर्मला पाटील, विभागीय अध्यक्षा संगिता म्हात्रे, उपाध्यक्षा निर्मला ठाकूर , कलंबुसरे गावच्या सरपंच ऊर्मिला निनाद नाईक उपसरपंच सारिका पाटील,सदस्या स्वप्नाली पाटील, सरचिटणीस पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी विनया पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदर्श प्रियदर्शनी महिला मंडळ च्या महिलांनी मेहनत घेतली