आदिवासी विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ!
शेतकरी कामगार पक्षाचा अनोखा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : डाऊरनगरमधील आदिवासी विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोरेश्वर भोईर तसेच सर्व टीम यांच्या वतीने एसटी स्टँडच्या नजीक साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या अध्यक्षा सीमा अनंत घरत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. यामध्ये 75 आदिवासी महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सर्व महिलांना साडी वाटप सहावारी व नऊवारी असे वानाच्या रूपात देण्यात आले. तसेच वुमनमन क्लबच्या वतीने तिळगुळ खाऊ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित म्हात्रे गुरुजींनी सूत्रसंचालन केले. सूत्रसंचालनात महिलांना शासकीय योजनांची माहिती आणि आपण विधवा असल्या तरी मनात शंका बाळगू नका.आपण देवाच्या लेकी आहोत आपण रोज सकाळी देवाला हळदीकुंकू लावतो मग अशा प्रसंगी अशा समारंभात आपण सहभागी झाली पाहिजे, असे म्हात्रे यांनी सांगितले.तसेच लेक लाडकी अभियानांतर्गत बालवाडीच्या शिक्षकांनी माहिती दिली.
या प्रसंगी महिला शहराध्यक्ष नयना पाटील तसेच शहराध्यक्ष शेखर पाटील, शंकर भोईर,चाणजे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रदीप नाखवा तसेच तसेच मनीष कातकरी, शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस यशवंत ठाकूर, कार्यालयीन चिटणीस नयन आप्पा म्हात्रे उपस्थित होते. याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते मोरेश्वर भोईर यांनी आपल्या भाषणात मी असेपर्यंत हे हळदीकुंकू होत राहील असे आश्वासन दिले.