आ. आशीष शेलार यांच्या हस्ते चांद्रयान-३ मोहिमेवरील गीतांचे प्रकाशन
मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ : भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अतुल शाह यांनी चांद्रयान-३ मोहिमेवर बनविलेल्या मराठी व हिंदी गीतांचे प्रकाशन मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आ. आशीष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक,प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,प्रदेश प्रवक्त्या राणी द्विवेदी आदी उपस्थित होते.
चांद्रयान-३ अभियानाविषयी समस्त भारतीय जनतेच्या मनात असलेल्या अभिमानाच्या भावना या गीतांमधून व्यक्त झाल्या आहेत, असे श्री. शेलार यांनी यावेळी सांगितले. श्री. शेलार यांच्या हस्ते या गीताचे मराठी गीतकार मोहन सामंत,हिंदी गीतकार मयांक वैद्य, संगीतकार दत्ता थिटे, गायक आशीष देशमुख, राहुल जोशी आदींचा सत्कार करण्यात आला.