उरणमधील पाणीपुरवठा सुरळीत करावा
शेखर पाटील यांच्यामार्फत नगर पालिकेला निवेदन
उरण दि 5(विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरातील पाणीपुरवठा रविवारी मंगळवारी व शुक्रवारी बंद राहील अशा प्रकारचे पत्र एमआयडीसी ने नगर पालिकेला दिले आहे.या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे उरण शहरचिटणीस शेखर पाटील यांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नगरपालिकेला निवेदन दिले.
शहरामध्ये अगोदरच अपुरा पाणीपुरवठा आहे त्यामध्ये जर आठवड्यातून तीन दिवस (रविवार, मंगळवार, शुक्रवार )पाणीपुरवठा बंद राहिला तर उरण शहराला मोठी पाणी टंचाई भासेल यासंदर्भात उपाययोजना करावी शहराला आलेली एम आय डी सि चे थकीत पाणी पट्टी भरावी.शहरात धुळीवाडा, कोटनाका येथे पिण्याच्या पाईपलाईन मधून घाणेरडे पाणी येते यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे शहरांमध्ये गेल्या महिनाभरात कीटकनाशकांची फवारणी होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे तरी किटकनाशके फवारणी नियमित करावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर भवरा येथील रस्त्यात अडथळा आणणारा इलेक्ट्रिक पोल हटवावा अशी मागणी करण्यात आली यासंदर्भातील निवेदन वरिष्ठ लिपिक संजय डापसे यांना देण्यात आले. या समस्या बाबत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.
यावेळी समस्या बाबत संबंधित विभागाला सूचना करण्याचे सांगितले. यावेळी शहरचिटणीस शेखर पाटील, विभाग चिटणीस दिलीप पाटील जेष्ठ कार्यकर्ते शंकर भोईर, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, शांताराम म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.