उरणमध्ये रविवारी वधू-वर मेळाव्याचे आयोजन
अनिष्ट रूढी परंपरांसह स्त्रीभ्रूणहत्ये विरोधात होणार प्रबोधन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) अंतर्गत उरण तालुक्यातील चाणजे, करंजा व मोरा केंद्र- उरण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कै. नानासाहेब धर्माधिकारी नगरपरिषद शाळा, उरण शहर येथे सर्व जाती धर्मीय वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा सर्वांसाठी विनामूल्य आहे. विवाह नोंदणी व अपेक्षित स्थळांची माहिती या मेळाव्यात मिळणार आहे.विवाह संस्कार करतांना शास्त्रोक्त पूजा विधी बाबींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.पर्यावरण पूरक विवाह व त्यावर प्रबोधन (फटाके बंदी,डी.जे. बंदी,अन्न नासाडी टाळणे इ.)या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व जाती -धर्मीय वधू वर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळा, वैवाहिक जीवन योग्य होण्यासाठी समुपदेशन व आध्यात्मिक सेवा, समाजातील अनिष्ट रूढी (हुंडा,मानपान, स्त्री-भृणहत्या ) अशा बाबींवर निर्मुलनपर प्रबोधन इत्यादी या सर्व बाबी मेळाव्यात अंतर्भूत असणार आहेत.
इच्छुक वधू वरांनी या वधू वर मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी खालील फोन नंबर वर संपर्क साधावे.
9029614655,9969406959,7208414561,9819580290