उरण-पनवेल रोडवर भीषण अपघातात एक ठार
उरण पनवेल मार्ग बनला मृत्यूचा सापळा
उरण दि. १ (विठ्ठल ममताबादे ) : उरण पनवेल मार्ग हा मृत्युचा सापळा बनला असून या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात होत असतात. अनेक मोठया अपघातात अनेकांचे जीव गेलेले आहेत. अशाच प्रकारे एक अपघात दि 1 ऑगस्ट 2023 रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा येथे घडला आहे. या अपघातामुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला आहे. उरण पनवेल रोडवरील गव्हाण ब्रिज वर भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून, यामध्ये एक प्रवासी मृत्युमुखी पडला आहे.
पनवेल वरून उरणच्या दिशेने येणाऱ्या इको गाडीला ट्रेलर ने धडक दिल्याने उरण पनवेल मार्गावरील गव्हाण ब्रिजवर भीषण अपघाता झाला आहे. ईको गाडीमध्ये पाच प्रवासी बसले होते यामध्ये ड्रायव्हर व इतर प्रवासी वाचले असून ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेले तेलंगे नावाचे प्रवासी यांचा मात्र मृत्यू झाला आहे.
या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.मात्र असे अपघात घडून मृत्यू होण्याची ही पहिली घटना नसून या मार्गावर वाहनांची अपघात होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत.त्यामुळे या मार्गांवर पोलिसांची कायम स्वरूपी नेमणूक करावी व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गांनी प्रशासनाकडे केली आहे.