महाराष्ट्रराष्ट्रीय

उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनकडून कोलकाता येथील डॉक्टर हत्येचा निषेध

अत्यावश्यक वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद करून पाळला निषेध

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन ही उरणमधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांची पालक संघटना आहे. या संघटनेतर्फे कोलकत्ता येथील डॉक्टर वर झालेल्या अमानुष हत्तेचा जाहिर निषेध करण्यात आला. दि ०९ ऑगस्ट २०२४ रोजी आर. जी. मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे ३१ वर्षीय ट्रेनी बेस्ट फिजिशियन महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचार व दुर्देवी मृत्युचा उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी जाहीर निषेध केला आहे.

डॉक्टरांवर वारंवार होणा-या हल्ल्यांबाबत संघटनेने अनेक स्तरावर आपले मत परखडपणे मांडले आहे. सदरच्या घटनेत सुध्दा डॉक्टरांना सॉफ्ट टार्गेट समजून व आरूषी हत्याकांडा प्रमाणे लैंगिक अत्याचार/बलात्कार करून त्या महिला डॉक्टरची निघृणपणे हत्या करण्यात आली. हा गैंगरेप व हत्येचा प्रकार असून उरण मेडिकल असोसिएशन या गुन्हयाच्या विरोधात व महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी कडक शब्दात निषेध व्यक्त करीत आहे.अशी माहिती डॉ. सत्या ठाकरे यांनी दिली.

यां घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच रायगड मेडिकल असोसिएशनने राष्ट्रीय स्तरावर दिनांक १७/०८/२०२४ सकाळी ६:०० ते १८/०८/२०२४ सकाळी ६:०० पर्यन्त इमरजेन्सी वगळता सगळ्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन संपूर्ण भारतातील डॉक्टरांना केले आहे. महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचारा बद्दल व डॉक्टरांवर होणा-या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी IMA/RMA च्या हाकेला प्रतिसाद देत उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन ने इमरजेन्सी वगळता इतर वैद्यकीय सेवा दिनांक १७/०८/२०२४ सकाळी ६:०० ते १८/०८/२०२४ सकाळी ६:०० पर्यन्त बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाला उरणच्या जनतेचा, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डॉक्टर वर झालेल्या हल्ल्याच्या आरोपीला त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन तर्फे उरण पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देण्यात आले.

याचबरोबर तहसील कार्यालयात तहसीलदार उद्धव कदम यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे डॉ. सुरेश पाटील (पेट्रोन ), डॉ सत्या ठाकरे (सेक्रेटरी ), डॉ. संजीव म्हात्रे (सदस्य ), डॉ मनोज भद्रे (सदस्य ), डॉ अजय कोळी (सदस्य )तसेच इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button