काँग्रेसचा १३८ वा वर्धापन दिन उरणमध्ये साजरा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असलेल्या कॉंग्रेस पक्षाला मोठा इतिहास असून या पक्षाचा 138 वा वर्धापन संपूर्ण देशात सर्वत्र मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, मिलिंद पाडगावकर वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष, किरीट पाटील -जिल्हा उपाध्यक्ष, गणेश सेवक -महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अफशा मुकरी -माजी नगरसेवक,वैभव ठाकूर तालुका सरचिटणीस, चंदा मेवाती शहर उपाध्यक्ष,माजी ग्रामपंचायत सदस्य निर्मला म्हात्रे, अमीदा पटेल, दिलीप जाधव आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आले.
यावेळी विनोद म्हात्रे, प्रकाश पाटील, मिलिंद पाडगावकर, किरीट पाटील यांनी 138 व्या वर्धापन दिनानिमित्त आपली मनोगत व्यक्त केले. भारत जोडो यात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त नागरिक या माध्यमातून पक्षाशी जोडत आहेत.काँग्रेस पक्षाला जनाधार वाढत असून भविष्यात काँग्रेस पक्ष एक नंबर वर असेल असे विनोद म्हात्रे यांनी सांगितले तर प्रकाश पाटील यांनी 138 वर्धापन दिन साजरे करताना आनंद होत आहे असे सांगत ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने, एकत्र काम करून पक्षाची खरी ताकद सर्वांना दाखवावी,असे आवाहन प्रकाश पाटील यांनी केले. मिलिंद पाडगावकर, किरीट पाटील यांनी पक्षाचा इतिहास, पक्षाची उद्दिष्टे सर्वांना सांगितले.