महाराष्ट्र
कोकणच्या सिनेनाट्य विद्यालयाचे रत्नागिरीत आज उद्घाटन
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोकणच्या सिनेनाट्य विद्यालयाचे रविवारी दुपारी उद्घाटन केले जाणार आहे.
हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा कार्यक्रमात हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने सामंत यांची रविवार, दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या कार्यकारणी सभेत उपस्थिती, स्थळ:- शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी.
दुपारी 2 वाजता- रंगशाळा- कोकणाचे सिने-नाट्य विद्यालय च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ:- रंगशाळा गोंधळेकर हॉस्पिटलच्या जवळ, बाळकृष्ण नगर, नाचणे रोड,रत्नागिरी.