कोकणातून धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे
राजधानी एक्सप्रेसचाही समावेश
रत्नागिरी : उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या आणखीन तीन एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार 22 908 22 907 हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला हापा येथून धावताना दिनांक 24 मे रोजी तर मडगाव येथून धावताना दिनांक 26 मे 2023 रोजी स्लीपर श्रेणीमधील एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.
पोरबंदर ते कोचुवेली या दरम्यान धावणाऱ्या गाडीला (20910 /20909) या गाडीला देखील स्लीपरचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे. पोरबंदर ते कोचुवेली या मार्गावर धावताना दिनांक 25 रोजी तर कोचुवेली ते पोरबंदर या मार्गावर धावताना या गाडीला दिनांक 28 मे 2023 रोजी अतिरिक्त डबा जोडला जाईल.