कोकण रेल्वेमार्गे नागरकोईल- पनवेल विशेष गाडी धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. दिनांक 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत या विशेष गाडीच्या जाऊन येऊन एकूण ६ फेऱ्या होणार आहेत. वाढत्या गर्दीमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
ही गाडी(06071/06072) ही गाडी नागरकोईल ते पनवेल मार्गावर (06071) दिनांक 22 ऑगस्ट 2023 ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत दर मंगळवारी एकूण तीन फेऱ्या तर पनवेल ते नागरकोईल या मार्गावर दिनांक 24 ऑगस्ट 2023 ते सात सप्टेंबर 2023 म्हणजे दर गुरुवारी तीन फेऱ्या म्हणजे या विशेष गाडीच्या जाता येताना च्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.
वरील कालावधीत ही गाडी नागरकोइल येथून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या वेळेला दिवशी दहा वाजून 45 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल. पनवेल येथून ही गाडी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि नागरकोईल ला ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी दहा वाजता पोहचेल.
पनवेल मडगाव दरम्यान गाडी रोहा माणगाव खेड चिपळूण रत्नागिरी कणकवली सावंतवाडी तसेच थिवीला थांबणार आहे.